Home latest News दिवस, भेटण्याचा.!, नायर रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलनाचे आयोजन
“दिवस, भेटण्याचा.!”
हूरहूर संपली, प्रतीक्षा सरली,
दिवस उगवला, भेटीचा,
जिवलगांशी,
हितगुज करण्याचा,
जुन्या आठवणी, उगाळण्याचा .!
आहे ते मैत्र मनाचं ,
नातं स्वतःचं,
मन मोकळं करण्याचं,
अन सुख, दुःखात भागीदारी,
करण्याचं.!

सेवा निवृत्तीचा काळ,
बराच लोटला,
ठरवलं कैकदा, भेटायचं,
पण संसाराच्या धबडग्यात,
कायम फिसकटायचं,!
घेवून मनावर,
अजितने शिरावर,
गोतावळा जमवण्याचा, घाट घातला,
क्षण पकडला, दिवस ठरवला,
अखेर पळ तो, आज उगवला.!
चला भेटूयात,
क्षण मिलनाचे, उरात भरवूयात,
झालंय वय, गात्र थकलीय,
कुणास ठाऊक,
पुन्हा भेट होते की नाय.!
पुन्हा भेट, होते की नाय.!!
पुन्हा भेट, होते की नाय.!!!
कवी: अरुण निकम, मुंबई
मो: 9323249487
दि: 24/05/2025