केस्तुली येथे श्री दत्तगुरू मंदिर जिर्णोद्धार, नुतन मुर्ती प्राणप्रतिष्ठा पना व कलशारोहण सोहळा…
✍️विकास आग्रे✍️
माणगाव प्रतिनिधी
📞9326660640📞
माणगांव: माणगाव तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या केस्तुली या गावी समस्त ग्रामस्थ,मुंबई मंडळ, महीला मंडळ आणि देणगीदार यांच्या सहकार्याने नव्याने उभारलेल्या श्री दत्तमंदिर जीर्णोद्धार, नुतन मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा मिती ज्येष्ठ ||ध्रु|| ||१२|| शके १९४७ रविवार दिनांक ०८ जुन २०२५ रोजी सद्गुरू गुरुवर्य ज्ञानभास्कर श्री. ष.ब क्र. प्र. १०८ श्री महादेव शिवाचार्थ वाईकर महाराज यांच्या दिव्यसानिध्यात व प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय श्री निवासशेठ बंडु बेंडखळे (गोरेगाव) यांचे शुभहस्ते संपन्न होत आहे. तसेच सभागृहाचे उद्घाटन नामदार श्री. भरतशेठ मारुती गोगावले कॅबिनेट मंत्री ( फलोत्पादने, रोजगार हमी व खारभुमी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य) यांचे शुभहस्ते संपन्न होत आहे. सोबतच या कार्यक्रमासाठी मा.श्री. प्रमोद घोसाळकर (रायगड जिल्हा प्रमुख) तसेच मा. श्री.रमेश मोरे ( रायगड उपजिल्हा प्रमुख)सोबतच तालूक्यातीलअनेक मान्यवर, भक्तजन मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे:शुक्रवार दिनांक: ६/०६/२०२५ रोजी दुपारी. ३.०० ते ६.०० पर्यंत सवाद्य १०८ कलशासहीत सुगासिनी संधित ग्राम प्रदक्षिणा व मिरवणूक सोहळा. सायंकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत नुतन मुर्तीला जलाधिवास, धान्याधिवाल, राधनाधिवात व रात्री १० ते ११ या वेळेत ग्रामस्थांचे सुस्वर भजन होईल. शनिवार दिनांक:७/०६/२०२५ रोजी सकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत मंदीर उद्घाटन सोहळा त्यानंतर ७.३० ते ८.०० या वेळेत ग्रामदेवता मान पान विडे, सकाळी ८.०० ते ८.३० यावेळी महाद्वार पूजन व वास्तदेवता नारळ देणे त्यानंतर सकाळी ९.३० ते १२.३० पर्यंत मंदीराच्या नुतन वास्तु निमित्त तसेच मुर्ती प्राणप्रतिष्ठापने निमित्त संकल्पित देवी देवतांचे पुजन, श्री गणपती पूजन,प्रधानदेवता पूजन, अष्टभैरव पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, वास्तुमंडल पूजन, सर्वतोभद्र मंडळ पूजन, क्षेत्रपाल पूजन व होमहवन व रात्री १० ते १२ यावेळेत लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.रविवार दिनांक ८/६/२०२५ रोजी मुर्ती प्राण प्रतिष्ठा सकाळी व नुतन मूर्तींना अभिषेक सोहळा पार पडेल. तद्नंतर सद्गुरू वाईकर महाराज यांचे दिव्य सानिध्यात मुर्तीला प्राणमंत्र व कलशारोहण सोहळा व हवनपुर्णाहुती महाराजांची पाठ्यपुजा व आशिर्वाचन महामंगल आरती त्यानंतर सभागृह उद्घाटन सोहळा व सत्कार समारंभ होईल.कार्यवाहक व्यवस्थापक हे केस्तुली ग्रामस्थ, मुंबई मंडळ, महिला मंडळ व क्रिकेट संघ असतील. तरी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून उपकृत सहकार्य करावे अशी विनंती श्री दत्तगुरू विकास मंडळ केस्तुली यांनी भाविकांना केलेली आहे.