खंडित वीजपुरवठ्यामुळे वरसोली ग्रामस्थांची महावितरणवर धडक

खंडित वीजपुरवठ्यामुळे वरसोली ग्रामस्थांची महावितरणवर धडक

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- गेल्या चार पाच दिवस सातत्याने होणाऱ्या व खंडित वीजपुरवठ्यामुळे संतप्त वरसोली ग्रामस्थानी आज उपसरपंच मिलिंद कवळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यकारी अभियंता शैलेशकुमार यांच्यासोबत शिष्टमंडळाने चर्चा केली. कार्यकारी अभियंता शैलेशकुमार यांनी येत्या काही दिवसात सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
वरसोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गेल्या 4-5 दिवसात सातत्याने विजपुरवठा दिवस-रात्र खंडित होण्याचे प्रकार होत आहे. पावसाळा तर आताच चालू झालेला आहे, पावसाळा चालू होत असताना दिवसा-रात्री केंव्हाही कंडक्टर तुटण्याचे प्रकार होत आहेत. जास्त वेळा हे प्रकार रात्रीचे होत आहेत, त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे येत आहेत. कोळीवाडा, खंडाळकर आळी-ताडआळी, बुरुमखाण, नांदे या भागात व्होल्टेज प्रॉब्लेम होत आहे. तेथील असणारे ट्रान्सफार्मर हे 100-200 के व्हीचे टाकणे अवश्यक आहेत. स्ट्रीट लाईट सातत्याने फॉल्ट होणे, ते काढण्यासाठी 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागत असतो.

नांदे – विजयनगर येथील उच्च दाब पोल वाकलेला आहे, दोन एल टी सिमेंट पोल पूर्णपणे पडायला आलेले आहेत. एक सिमेंट पोल रस्त्यामध्ये आहे. सदर तिन्ही पोल तातडीने बदलणे अवश्यक असून, आता दोन पोल केंव्हाही पडण्याची शक्यता आहे.

रात्रीच्या वेळी लाईट गेल्यावर त्यावेळी वायरमन कर्मचारी उपलब्ध ठेवणे अवश्यक असून, तसेच रात्रीच्या वेळी लाईन पडल्यावर संपर्क कोणाला करणे, व त्यांचे नंबर चालू ठेवणेबावत संबधितांना सुचना देणे, किंवा फोन उचलण्याबाबत सुचना देणे.
वरील कामांबाबत आपणाकडून तातडीने दखल घेऊन विक झालेले कंडक्टर तातडीने बदलून व असणा-या समस्या सोडविण्याबाबत आपणाकडून योग्यती तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मिलिंद विजय कवळे यांच्यासह संजय पाटील नितीन माळवी, हर्षल नाईक, नम्रता वर्तक, नमिता माळवी, संजय कवळे, नितीन खाडे, गौरीश घरत, नितीश पाटील, विनोद घरत, प्रतिक म्हात्रे आदी उपस्थित होते.