सिंदेवाही तालुक्यातील घरकुल लाभार्थी व इतर स्थानिक वापरासाठी वाळु उपलब्ध
किशोर घाडगे, उपविभागीय अधिकारी, चिमुर यांचे उपस्थीतीत रेती वाटप
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही :- वाळु / रेती निर्गती धोरण 2025 अंतर्गत घरकुल लाभार्थी व इतर स्थानिक वापरासाठी वाळु उपलब्ध करुन देण्याबाबत सिंदेवाही तालुक्यातील जे वाळु / रेती गट लिलावामध्ये गेलेले नाही, त्या गटामधुन शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्याकरीता स्वामित्व धन न आकारता जास्तीत जास्त 5 ब्रॉसपर्यंत किंवा वाळु उपलब्धतेच्या समप्रमाणात वाळु उपलब्ध करुनb देण्याबाबत व इतर स्थानिक रहीवाशांनी त्यांच्या घराचेb बांधकामाकरीता वाळुची मागणी असल्यास 5 ब्रॉस मर्यादेत वाळु स्वामित्वधन रक्कम (रुपये 600/- प्रती ब्रास) जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व इतर अनुज्ञेय रक्मांचा भरणा करुन ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहे.विनय गौडा जी. सी. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली सिंदेवाही तालुक्यातील मौजा खातगाव, सरांडी, पेटगाव, गडबोरी व जामसाळा हे 5 रेतीघाट मोफत घरकुल लाभार्थ्याना रेती वाटप करण्याकरीता निश्चीत करण्यात आले आहे. तसेच पात्र घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळु । रेती वाटप करण्याकरीता वाहतुक परवाना ग्राम पंचायत अधिकारी व ग्राम महसुल अधिकारी यांचे मार्फत घरपोच वाटप करण्यात आले असुन सदर लाभार्थी मोफत वाळु । रेतो दिनांक 26/05/2025 रोजी पासुन संबंधीत गावा जवळ असलेल्या रेती घाटातुन उचल करीत आहे.
त्याअर्थी, मा. किशोर घाडगे, उपविभागीय अधिकारी, चिमुर यांनी दिनांक 29/05/2025 रोजी दुपारी 12.00 वाजता घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाबाबत सिंदेवाही तालुक्यातील मौजा खातगाव येथील रेतीघाटात प्रत्यक्ष भेट देउन रेतीसाठा व घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाचे नियोजनाबाबत तहसीलदार सिंदेवाही यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन त्यांच्या उपस्थीतीत घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप करण्यात आले. तसेच मा. उपविभागीय अधिकारी, चिमुर यांनी सर्व घरकुल लाभार्थ्यांना घराचे बांधकाम करण्याकरीता 5 ब्रास मोफत रेती शासनाकडून मिळत असल्याने सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेउन घराचे बांधकाम तात्काळ करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात आले.