राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्ली येथील चमूने शुक्रवारी मेट्रोपॉलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू)च्या कामाचा घेतला आढावा
मंजुषा सहारे
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी)च्या दिल्ली येथील चमूने शुक्रवारी (ता.३०) मेट्रोपॉलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू)च्या कामाचा आढावा घेतला. एनसीडीसी चे अतिरिक्त संचालक श्री. सुनील प्रकाश भारद्वाज व उपसंचालक डॉ. अंकुर गर्ग यांनी के.टी. नगर येथील एमएसयू इमारतीची पाहणी केली व केंद्र कार्यान्वित होण्यामध्ये येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी मनपा मुख्यालयात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांची भेट घेतली व एमएसयू कार्यान्वित करण्यात केंद्र शासनाच्या अखत्यारीतील विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत आश्वस्त केले.
के.टी. नगर येथील इमारत पाहणी दरम्यान एपीएचओ डॉ. आराधना भार्गव, मनपाचे उपअभियंता श्री. देवचंद काकडे, कनिष्ठ अभियंता श्री. सुनील नवघरे, एमएसयू चे सीनिअर पब्लिक हेल्थ स्पेशॅलिस्ट डॉ. वीरेंद्र वानखेडे, पब्लिक हेल्थ स्पेशॅलिस्ट डॉ. मिथून खेरडे, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. संदीप भोयर, प्रशासकीय अधिकारी डॉ. सोनल संघी, पीएमसी श्री. त्रिलोक ठाकरे आदी उपस्थित होते.