मुंबई च्या पोलीस अधिकारी ते शिपाई, सर्वाना मिळणार डिजिटल स्मार्ट ओळखपत्र.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- आता मुंबईच्या सर्व पोलीस दलातील मोठे अधिकारी व शिपायांपासून डिजिटल स्मार्ट ओळखपत्र दिले जाणार आहेत.यामुळे बनावट पोलीस ओळखपत्रांच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. हे ओळख पत्र पोलीस आयुक्त ते शिपाई अशा सर्व पदांवरील काम करणाऱ्याला दिले जाणार आहेत.
बनावट ओळख पत्रांच्या आधारे नागरिकांना धमाकावणे किंवा फसवणूक करण्याच्या गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी आता एक मोठा आणि महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याचा मुख्य उद्देश म्हणजे, बनावट पोलीस ओळखपत्र दाखवून नागरिकांना भ्रमित करणाऱ्या टोळ्यांना रोखणे आणि पोलीस खात्याच्या विश्वासारतेत वाढ करणे, या गोष्टींवर भर दिले जाणार आहे. हे स्मार्ट कार्ड फक्त मुंबई पोलीस दलासाठी लागू करण्यात येणार असून, त्यासाठी लागणाऱ्या सुमारे चार कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला गृहविभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे.
सध्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना छापील ओळखपत्र देण्यात येते.जे कोणत्याही सध्या डेस्कटॉप पब्लिशिंग तंत्र न्यानाच्या साहाय्याने सहज बनवता येते. यामुळे अशा बनावट ओळखपत्रांचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल करणं आणि फसवणूक करणे सोपे झाले आहे.विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांतून डिजिटल अरेस्ट सारख्या भामट्या प्रकारांना झपाट्याने चालना मिळाली आहे.जिथे बनावट पोलीस असल्याचा दावा करून लोकांकडून पैसे उकवळले जात आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर डिजिटल स्मार्ट कार्ड ओळखपत्राचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठवण्यात आला होता, आणि आता त्याला मंजुरी मिळाली आहे. या उपक्रमांतर्गत मुंबई पोलीस दलाच्या एकूण 51,308 मंजूर पदांवर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे स्मार्ट ओळखपत्र देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना अशा प्रकारचे स्मार्ट ओळखपत्र देणारे मुंबई पोलीस आयुक्तालय हे देशातील पहिले शासकीय कार्यालय ठरणार आहे.
हे कार्ड स्टील मटेरियल पासून बनवलेले असेल,आणि त्यावर संबंधित अधिकाऱ्यांचे छायाचित्र, क्यू आर कोड,आणि एक डिजिटल चिप असणार आहे. या क्यू आर कोड ला मोबाईलच्या साहाय्याने स्कॅन केल्यास संबदित अधिकाऱ्यांची तपशीलवार माहिती लगेच उपलब्ध होईल.यामुळे सर्व नागरिक कोणत्याही पोलिसांबद्दल खात्रीपूर्व माहिती घेऊ शकतील. या उपक्रमामुळे बनावट पोलीस आणि त्यांच्या नांवे होणाऱ्या फसवणूकीच्या प्रकारांना कायमचा आळा बसणार आहे.आणि पोलीस दलाबद्दलचा नागरिकांचा विश्वास अधिक बळकट होईल.