28धरणांत कोसळल्या सुखसरी ; जळसाठ्यात 11 टक्क्यांनी वाढ
सुतारवाडी प्रकल्पात १००% पाणी; लाखो नागरिकांची मिटणार जलचिंता
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील 28 धरणात 21 मे रोजी 27% जलसाठा शिल्लक होता. साधना तर दहा टक्क्यांपेक्षा कमी साठा शिल्लक होता; मात्र चार-पाच दिवस सलग पडत असलेल्या पावसाने त्यांच्या जळीसाठ्यात अकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. रोह्यातील सुतारवाडी धरण 100% भरले आहे.
रायगड जिल्ह्यात मुरुड (१), तळा (१), रोहा (१), पेण (१), अलिबाग (१), सुधागड (५), श्रीवर्धन (३), म्हसळा (२), महाड (४),कर्जत (२), खालापूर (३), पनवेल (३), उरण (१) या 13 तालुक्यात 28 धरणे आहेत. यामधून जिल्ह्यातील तसेच नवी मुंबईतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या सर्व धरणात 68.261 दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे. मे महिन्यापर्यंत जलसाठा कमी होत जातो.
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 28 धरणात 27% जलसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे मे महिना संपेपर्यंत पाण्याचे संकट गडद होण्याची शक्यता होती; मात्र 25 मे पासून सुरू झालेल्या पावसाने जलसाठा वाढण्यास मदत मिळाली. लवकरच जल चिंता मिटण्याची शक्यता आहे.
*सात दिवसात सरासरी ५०४ मिमी सरी कोसळल्या*
1. रायगड जिल्ह्यात २२ मे पासून धुंवाधार पाऊस कोसळत असून आतापर्यंत सरासरी ५०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ९९१ मिमी पावसाची नोंद मुरुड तालुक्यात झाली, तर सर्वात कमी १९२ मिमी नोंद माणगाव मध्ये झाली आहे. आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर रस्ते खचले आहेत.
2. बुधवारी सकाळी पावसाने उघडी दिल्यावर अर्धवट तुटलेली झाडे तोडण्याचे काम ठीक ठिकाणी सुरू होते, तर काही ठिकाणी अर्धवट तुटलेली घरे व्यवस्थित करण्याचे काम सुरू होते. रस्त्याच्या कडेला तुटलेली झाडे तोडण्याकरिता काही तासांकरिता वाहतूक बंद करण्यात आली आहे.
3. म्हसळा ,मुरुड, श्रीवर्धन ,माथेरान ,रोहा या तालुक्यांमध्ये ५०० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत १३ कच्चा आणि २६० पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे.
*आठवडाभरातील तालुका निहाय पर्जन्यमान*
मुरुड तालुक्यात तब्बल २९१ मिलिमीटर, तर म्हसळा तालुक्यात ७८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.त्या खालोखाल श्रीवर्धन ७७० ,तळा ६३९, पनवेल ६०५.५, रोहा ५०४ , माथेरान ४९३.८, अलिबाग ४२४, पोलादपूर ४०९ ,सुधागड ३७२ , पेण ३६८, महाड ३२८, खालापूर २८६, उरण २५४, कर्जत २४२, माणगाव १९२ मिमी पावसाची नोंद झाली.
*वाढलेला जलसाठा (टक्क्यात )*
फणसाड – १०
वावा – २०
सुतारवाडी -५३
कवेळे-१
कार्ले -१५
कुडकी -१७
पाभरे -४७
वरंध -१९
खिंडवाडी – १९
खैरे – २७