गोरेगांव मधे अवैध धंद्याना पोलीस प्रशासनाचा दुजोरा! कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

गोरेगांव मधे अवैध धंद्याना पोलीस प्रशासनाचा दुजोरा! कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

✍️ पप्पू वि.नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो:- 7304654862

मुंबई :- गोरेगांव पश्चिम मधे सरासरी पाहता अवैध धंदे वाढीस तेथील पोलीस प्रशासन जवाबदार असल्याचे धक्कादायक वृत्त दैनिक मीडिया वार्ता च्या प्रतिनिधिनी निरिषणा अर्थ मांडले आहे. त्याचा तपशील असा आहे, वाढते मटक्या चे धंद्दे, चायनीस फास्ट फूड मधे तळीरामांना दारू पिण्यास परवानगी, बिअर, अथवा वाईन शॉप च्याच बाहेर दारू पिण्यास मुभा, व गोरेगांव एस व्ही रोड वरील मुंबई पालिकेच्या बाहेर संध्याकाळच्या दरम्यान वजरी मुंड्डी, पाया सूप, गाडीवर होणारी तळीरामांची गर्दी. शहरांच्या अशा मुख्य ठिकाणी होणारी मुजोरीला कोण जवाबदार, याच जरा पोलीस प्रशासनाने उत्तर द्यावं.

गोरेगांव एम जी रोड वर तर सर्रास मटक्यांचे धंदे लाईनीत सुरु आहेत त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर येण्याची वेळ आलीय पण याच भान तेथील पोलीस प्रशासनाला कदाचित माहित नसेल, का पोसले जातंयत अवैध धंद्दे करणार्यांना हे जनतेने वेगळे सांगायची गरज नाही. प्रेम नगर मधे पण सर्रास चायनीज फूड मधे तळीरामांना दारू पिण्यास मुभा, व बिअर शॉपी व वाईन शॉप बाहेर सर्रास नियमांची पायमल्ली करून तळीराम हातात ग्लास घेऊन उभे असताना पहावयास मिळते.

पोलीस प्रशासनाचा किती विभागात अंकुश आहे, हे सर्व चित्र पाहून माहित होते कि हे आश्रय अवैध धंद्दे वाल्याना का आहेत. तिथल्या झोपू प्रतिनिधीचा, आमदार मॅडम, नगर सेवनकांचा होणारा दुर्लक्ष, आणि याचंच सुरेख उदाहरण म्हणजे गोरेगांव मधील अवैध धंद्दे, कुठल्याही निवडून दिलेल्या प्रतिनिधीचा मतदार संघात काय चालंय हेच समजत नसेल तर त्यांना आत्म परीक्षण करण्याची गरज आहे. कारण हे असंच जर चालत राहिलं तर सर्वासामान्य नागरिकांना या गोष्टीचा मोठा त्रास सोसावं लागेल, व गुन्हेगारी वाढण्यास मदत व्हायला वेळ लागणार नाही.

आता या वारं वार होणाऱ्या समस्यांचे निवारण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का व गोरेगांव मधल्या जनतेला न्याय देतील का असा सूर गोरेगांव च्या नागरिकांकडून होत आहे, सर्व तपास करून राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गोरेगांव पोलीस प्रशासनावर कारवाई करतील का असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिकांना पडू लागलाय, कारण जे करतील ते आता फडणवीस साहेबच, त्यांच्याकडून गोरेगांव नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत, आणि त्याला सार्थ ठरवतील अशी अशा नागरिकांना आहेत. आता सहन शक्तीचा अंत होतंय आता नाही तर कधीच नाही असे नागरिक बोलू लागले आहेत, पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्दे वाल्याना होणारा राज आश्रय कुठे तरी थांबवा या साठी काहीही करण्यास तयार आहोत, असे तिथले दैनिक मीडिया वार्ता चे प्रतिनिधी पप्पू नायर यांनी सांगितले आहे.