विद्यार्थ्यांच्या पाठीशी शेकाप कायम- चित्रलेखा पाटील यांची ग्वाही

विद्यार्थ्यांच्या पाठीशी शेकाप कायम- चित्रलेखा पाटील यांची ग्वाही

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- शेतकरी कामगार पक्षाने गोरगरीबांना केंद्र बिंदू मानून समाजात काम करण्याचा ध्यास ठेवला आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगारांना संरक्षण देण्याचे काम शेकापच करू शकतो. त्यासाठी वेगवेगळे आंदोलने, लढे शेकापच्या माध्यमातून झाले आहेत. शिक्षण घेत असताना, स्थानिक भूमीपूत्रांचा विचार करणे आपली जबाबदारी आहे. आजच्या पिढीच्या काळात उद्याचे भवितव्य अवलंबून आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याबरोबरच एक वेगळा मार्ग अवलंबून समाजाचे हीत साधण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. , असा विश्वास शेकाप राज्य मिडीया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.

शेतकरी कामगार पक्ष शिक्षक व शिक्षकेत्तर आघाडी, शेकाप पुरोगामी युवक संघटना आणि शेकाप विद्यार्थी संघटना यांच्या वतीने दहावी, बारावी परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शेतकरी भवन मधील सभागृहात रविवारी (दि.01) आयोजित करण्यात आला. स्व. लक्ष्मी नारायण पाटील गुणवंत पुरस्कार तथा सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, सुरेश घरत, नरेश म्हात्रे, ॲड. निलम हजारे, मो. रा. म्हात्रे, दिपक पाटील, प्रफुल्ल पाटील, निलेश खोत, मोहन धुमाळ,अनिल चोपडा, अनिल गोमा पाटील सतिश तरे, नागेश कुलकर्णी, , सतिश तरे, विक्रांत वार्डे, के. डी. पाटील, श्रीकांत पाटील आदी शेतकरी कामगार पक्ष शिक्षक व शिक्षकेत्तर आघाडी, शेकाप पुरोगामी युवक संघटना आणि शेकाप विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारी, सदस्य, दहावी, बारावीचे गुणवंत विद्यार्थी, पालक व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शेकाप राज्य मिडिया सेल प्रमुख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते स्व. नारायण नागू पाटील यांच्या पत्नी स्व. लक्ष्मी नारायण पाटील या शिक्षिका होत्या. त्यावेळी खाडीतून जाऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम त्यांनी केले.त्यांनी शिक्षणाला महत्व दिले. त्यांच्या कार्याची आठवण आजच्या पिढीला राहवी, यासाठी स्व. लक्ष्मी नारायण पाटील यांच्या नावाने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र दिले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना, येथील विकास कसा साधता येईल. येथील शेतकरी, कष्टकरी, कामगारांना न्याय कसा देता येईल याकडे बघणे गरजेचे आहे,असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
—————
शिक्षणाचा समृध्द वारसा मिळाला- ॲड. मानसी म्हात्रे
शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या हस्ते आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होत असल्याचा आनंद आहे. स्व. लक्ष्मी पाटील यांच्या नावाने सन्मानपत्र दिला जात आहे. यांची स्वातंत्र पुर्व काळात शिक्षणावर एक वेगळी पक्कड होती. एक शिक्षणाचा समृध्द वारसा आपल्याला मिळाला आहे. शिक्षण देण्याबरोबरच मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळ्या करण्यासाठी हजारो मुलींना सायकल देण्याचे काम चित्रलेखा पाटील यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी खुप मोठे व्हा. मात्र पाय कायम जमीनीवर ठेवा. शासकीय यंत्रणेच्या प्रवाहात दिसाल अशी अपेक्षा करते,असे शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या.