कॉटन मार्केट परिसरात सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई
७० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098
नागपूर :- सदर माहिती याप्रमाणे आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांच्या टीमसह श्री. आकाश तितारे व त्यांच्या पथकाने धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट परिसरात सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान ७० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि श्री. हेमंत अँड कंपनी यांच्यावर ₹५,०००/- दंड ठोठावण्यात आला.