१०० दिवस मोहिमेत नागपूर समाज कल्याण विभाग प्रथम

१०० दिवस मोहिमेत नागपूर समाज कल्याण विभाग प्रथम

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने सत्कार

✍🏻 जयंत साठे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 82753 00034

नागपूर :- १०० दिवस मोहिमेत नागपूर समाज कल्याण विभागाचा प्रथम क्रमांक आला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये “१०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम” अंतर्गत शासनाच्या विविध विभागांनी सहभाग घेतलेला होता, त्यामध्ये नागपूर कार्यालयाने केलेल्या उत्कृष्ट तथा स्तुत्य कामगिरीबद्दल व सामाजिक न्याय विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाधून प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर कार्यालयाची प्रथम क्रमांकावर शासनाद्वारे निवड करण्यात आली. या यशाबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण महाराष्ट्र राज्याचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणेचे महासंचालक सुनिल वारे यांचे हस्ते प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड व समाज कल्याण अधिकारी सुखदेव कौरती यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात दुसऱ्या टप्प्यात राज्याच्या सर्व महसुली विभागामधील राज्यातील 40 विभागस्तरीय कार्यालयांच्या व सर्व जिल्ह्यांमधील 42 जिल्हास्तरीय कार्यालय या स्पर्धेत सहभागी झाले होते. सामाजिक न्याय विभागाच्या राज्यातील सर्व विभागीय स्तरावरील / प्रादेशिक स्तरावर कार्यालयांमध्ये प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांमधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर प्रथम क्रमांकावर तर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली कार्यालयाचा तृतीय क्रमांक आलेला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या सर्व अधिकारी वर्गाचे कार्यशाळेचे आयोजन यशदा पुणे येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमात 100 दिवस मोहिमेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल आलेल्या सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
राज्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल समाज कल्याण विभाग नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली या तिनही कार्यालयाने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात येत आहे.