जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वडवली येथे चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद — अदाणी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडचा उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वडवली येथे चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद — अदाणी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडचा उपक्रम

✍️सचिन सतीश मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞

दिघी – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अदाणी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड यांच्या वतीने दिनांक ०३ जून २०२५ रोजी वडवली येथे रंगीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांमधील चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.
“पर्यावरण संवर्धन – काळाची गरज” या विषयावर आधारित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
इयत्ता १ ली ते ४ थी या गटात कु. श्रियानी सुशांत पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. कु. रेहा उल्हास कीर हिला द्वितीय, तर प्राशी रविंद्र नाक्ती हिला तृतीय क्रमांक मिळाला.
इयत्ता ५ वी ते ८ वी गटात कु. स्पृहा प्रथमेश कीर प्रथम, कु. कृष्णाई सुशांत पाटील द्वितीय आणि कु. आराध्या नितीन पिळणकर तृतीय क्रमांकाची मानकरी ठरल्या.
इयत्ता ८ वी ते १२ वी या गटात श्रवण हितेश गुहागरकर याने प्रथम क्रमांक पटकावला, निहान नितीन पिळणकर याने द्वितीय, तर दक्ष देवेंद्र शिलकर याने तृतीय क्रमांक मिळवला.
विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला अदाणी फाउंडेशनच्या प्रोजेक्ट मॅनेजर जयश्री काळे व अवधूत पाटील यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामसखी अरुंधती पिळणकर यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून अशा स्पर्धांमुळे त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्याचे पालक वर्गातून सांगण्यात आले.