म्हसळ्याचा मयुरेश उदय म्हशीलकर ठरला सुवर्णपदकाच्या मानकरी

म्हसळ्याचा मयुरेश उदय म्हशीलकर ठरला सुवर्णपदकाच्या मानकरी

✍️सचिन सतीश मापुस्कर ✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞

दिघी – म्हसळा तालुक्यातील कुमार मयुरेश उदय म्हशीलकर या २० वर्षाच्या मुलाने १२० किलो वजनी गटात नवीन नॅशनल रेकॉर्ड केला आहे . पॉवरलिफ्टिंग चैम्पियनशिप २०२५ ही कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात दिनांक २५/०५/२०२५ रोजी आयोजित झाली होती. संपूर्ण भारतातून येथे स्पर्धक आले होते. मयुरेशने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.या स्पर्धकांमध्ये अव्वल ठरत आपल्या म्हसळ्याच्या ह्या पठ्ठ्याने देशस्तरावर नवीन रेकॉर्ड केला आहे. यामुळे मयुरेश ला सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. हा म्हसळा येथील असून सध्या गुजरात येथे आहे त्याचे वडील रेल्वे पोलिस डिपार्टमेंट मध्ये आहेत तसेच आई प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. त्यामुळे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. मयुरेशने म्हसळ्याचे नाव देशपातळीवर उंचावले आहे.