६७ लाखाचे दागिने झाले चोरी.
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर
मो 9096817953
नागपूर.एका व्यवसायाच्या घरून ६४ लाख रुपयांचे दागिने चोरी झाले. ही खळबळ जनक घटना बजेरियात सोमवारी उघडकीस आली. सनी गुप्ता (३९) रा मारवाडी चाळ बजेरिया यांचे बजेरिया येते फर्निचर चे शोरूम आहे.
घरी आई वडिल, पत्नीसह ते राहतात. सनी दुकान सांभाळतात. पंधरा दिवसांपूर्वी त्यांची आई बाहेरगावी नातेवाईकांकडे गेली. तत्पूर्वी त्यांनी सोने, डायमंड आणि प्लॅटिनमचे मौल्यवान दागिने तसेच दहा हजार रुपये रोख असा एकूण ४७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल बेडरुममधील कपाटात. पंधरा दिवसांनी त्या घरी परतल्या.
त्यांना २ जून रोजी बाहेर जायचे होते. त्यामुळे कपाटातील दागिन्यांची बॅग काढली. मात्र, त्यात दागिने नव्हते. त्यामुळे त्यांना धडकी भरली. ही माहिती त्यांनी लगेच मुलगा सनी यांना दिली. त्याने गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. ठसे तज्ज्ञांनी बोटांचे ठसे घेतले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. घरी येणाऱ्यापैकी कोणीतरी दागिने चोरले असावेत, असा संशय आहे. दरम्यान एक दिवसांपूर्वीच चोरांनी कोतवालीच्या महाल परिसरात घरफोडी करीत २५ लाखांचे दागिने पळविले. त्यानंतर गणेशपेठेतील ही दुसरी घटना आहे. पोलिस यादिशेनेही तपास करीत आहे.