बहिणीलाच अमानुष मारहाण केली.

बहिणीलाच अमानुष मारहाण केली.

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर.
मो 9096817953

नागपुर.कौटुंबिक वादातून एका माथेफिरूने वृद्ध बहिणीलाच अमानुष मारहाण केली. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी किरण शाहू (६०) रा.रामनगर, तेलंगखेडी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. कृष्णा गौरीशंकर शाहू (४८) असे आरोपी भावाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि त्यांचे लहान भाऊ कृष्णा व जगदीश एकाच इमारतीत राहतात. पहिल्या किरण राहते. त्यांनी इतर खोल्या भाड्याने दिल्या आहेत. भाड्याच्या पैशांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो तर कृष्णा तळमजल्यावर आपल्या कुटुंबासह राहतो. तो नेहमी लहान-लहान गोष्टींवरून किरणशी वाद घालत असतो. त्यामुळे किरणने त्याच्याविरुद्ध अंबाझरी ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी कृष्णाविरुद्ध गुन्हाही नोंदविला होता.

१६ एप्रिलच्या दुपारी किरण आपल्या घरी जिन्यावर झाडू लावत या दरम्यान कृष्णा तेथे आला. किरणला मारहाण केली. जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. किरण बेशुद्ध पडल्या. त्यानंतरही कृष्णा थांबला नाही आणि मारतच राहिला. त्याने किरणच्या अंगावर सायकलही पाडली. नंतर निघून गेला. भाडेकरूंनी त्यांना रुग्णालयात पोहोचविले. डोक्याला गंभीर दुखापत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर किरण यांनी तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.