नेरळ गणेश मंदिरातील दानपेटी चोर पोलिसांच्या ताब्यात

नेरळ गणेश मंदिरातील दानपेटी चोर पोलिसांच्या ताब्यात

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

नेरळ :- नेरळ पोलीस ठाणे हद्दीत ५ मे रोजी गुन्हा क्रमांक 74/ 2025 bms कलम 305 प्रमाणे नोंद झाला होता. सदर गुन्ह्याची हकीकत अशी ही शेलू गावातील आर्या पॅराडाईज सोसायटी मधील असलेल्या सार्वजनिक गणेश मंदिराजवळ स्टीलची दानपेटी चोरट्याने चोरून नेली होती. यामध्ये अंदाजे 30 हजार ची रक्कम चोरी झाल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल झाली. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने अथक परिश्रम करून तांत्रिक मदतीच्या माध्यमातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्यातील दानपेटी व वीस हजार रक्कम जप्त केली आहे अधिक तपास पोलीस हवालदार 2384 सचिन वाघमारे करीत आहेत.