प्रतीक ननावरेवर खंडणीचे गुन्हे; गो-सेवक असल्याबाबत संशय
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
कर्जत :- दिनांक ४ जून रोजी प्रतीक ननावरे राहणार नवी मुंबई याने 40-50 सहकारी घेऊन नेरळ पोलीस ठाणे येथे आला व पोलीस ठाण्यात माहिती दिली की दामाद गावात आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने कुर्बानी करता 400-500 गोवंशीय जनावरे आहेत. या अगोदर दामत येथील सर्व गोवंशय जनावरांना पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत टॅग करून घेणेबाबत गुरांचे मालकांना सूचना देण्यात आला होत्या. तरी देखील सदर माहितीच्या अनुषंगाने नेरळ पोलिसांनी आधीपासून दामत गावात सर्च ऑपरेशन राबवला असता त्यामध्ये 17 गोवंशय जनावरे ही बिना टॅगच्या आढळून आल्याने संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
परंतु तरीदेखील प्रतीक ननावरे याचे समाधान न झाल्याने तो त्याचे सहकारी यांच्यासोबत नेरळ पोलीस ठाणे येथे धरणे आंदोलन करण्यास बसल. या अगोदर प्रतीक ननावरे यांनी बकऱ्यांची गाडी अडून गाडी माणसाकडून पैशांची खंडणी मागितल्याने त्याच्या विरोधात देवनार पोलीस ठाणे येथे 284/ 2025 भादवी कलम 120 ब 384/ 385 प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे समजते. सदर वेळी नेरळ येथील विश्व हिंदू परिषदेचे दीपक गायकवाड गोरक्षक प्रथमेश खेडकर, अमोल सूर्यवंशी,ओमकार भडसावळे यांनी प्रतीक ननावरे यास पोलिसांनी कारवाई केली असून तू आता निघून जा त्यांनी लोकांची बदनामी होईल असे कृत्य करू नको असे सांगितले असता तुम्ही स्थानिक गोरक्षक दामात येथील कसाई यांच्याकडून पैसे खाता. असा आरोप केल्याने स्थानिक व बाहेरील गोरक्षक असा वाद निर्माण झाला होता.
दिनांक 5 जून रोजी प्रतिक ननावरे याच्या सांगण्यावरून त्याच्या सहकाऱ्यांनी कर्जत बदलापूर रोडवर टीवाळे नाका येथे वाहने अडवल्याने येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी सदर बेकायदेशीर जमावास बाजूला करून तेथील परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली व संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. तसेच त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.
एकंदरीत प्रतिक ननावरे हा खरा गोसेवक असल्याचे भासवतो. त्याचे आर्थिक उद्देशा करिता नेरळ येथे बाहेरील मुलं घेऊन आला होता परंतु स्थानिक गोरक्षक आणि त्यास विरोध करून कोणत्याही प्रकारे दात दिली नाही. सद्यस्थिती नेरळ परिसरात शांतता असून रायगड जिल्ह्याचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे भेट देऊन सदर घटनेचा आढावा घेतला. सदर घटनेची गंभीरपणे दखल घेतली आहेत. तसेच दामत व इतर गावात गौवंशय जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्या इसमान विरुद्ध खडक स्वरूपाची कारवाई करण्याच्या सूचना प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना दिले आहेत.