अन्यथा कडवे आंदोलन करणार
शेकाप आरसीएफ गेट संघर्ष समितीची बैठक
आरसीएफ कंपनी प्रशासनाला एक महिन्याचा अल्टीमेटम
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये स्थानिकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. आरसीएफ कंपनी प्रशासनाची भेट घेऊन स्थानिकांसाठी मार्ग खुला करण्यात यावा अशी, मागणी केली होती. परंतु आरसीएफ प्रशासनाने कोणतीही भुमिका अद्याप घेतली नाही. त्यामुळे आता शेकाप स्टाईलने त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. येत्या 1 जूलैपर्यंत प्रवेश पुर्ववत सुरू केला नाही, तर एक वेगळी भूमिका घेऊन दोन जूलै नंतर कडवे आंदोलन करण्यात येणार आहे. भूमीपुत्रासाठी रस्त्यावर उतरणार आहे. याला आरसीएफ प्रशासनच जबाबदार राहिल असा इशारा शेकाप राज्य मिडीया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.
शेकाप आरसीएफ गेट संघर्ष समितीची बैठक चेंढरे येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात रविवारी (दि.08) आयोजित करण्यात आली. त्यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या.
यावेळी अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील, चेंढरचे माजी सदस्य दत्ता ढवळे, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, संदीप ढवळे, ॲड. परेश देशमुख, प्रशांत फुलगांवकर, अवधूत पाटील, ओमकार पाटील, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे आदी मान्यवर, पदाधिकारी तसेच कुरुळ, वेश्वी, चेंढरे येथील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.
आरसीएफ कंपनी प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिकांचा वसाहतीमधील प्रवेश बंद केला. कुरुळ, चेंढरे, वेश्वी येथील नागरिकांसह स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकरी कामगार पक्षाची नाळ सर्वसामान्यांशी जोडली गेली आहे. लोकांचे प्रश्न सोडविणे ही शेतकरी कामगार पक्षाची संस्कृती राहिली आहे.
थळ येथे आरसीएफ कंपनी उभी राहिली. कुरुळ, चेंढरे, वेश्वी येथील शेतकऱ्यांनी जमीनी दिल्या, म्हणून आरसीएफ कर्मचारी वसाहत उभी राहिली. मात्र कंपनी प्रशासनाने अनेक कारणे सांगून वसाहतीमधून येण्या जाण्याचा मार्ग बंद केला, आरसीएफ प्रशासनाची ही भूमिका स्थानिकांसाठी अन्यायकारक असून चुकीची आहे. अलिबाग पेण रेवदंडा बायपास या ठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या मार्गावरून अपघात होण्याची भिती आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनाची भेट घेऊन वसाहतीमधून रस्ता पुर्ववत सुरु करण्याची मागणी करून प्रशासनाला संधी दिली. मात्र त्यांनी अद्यापही भूमिका घेतली नाही. त्यामुळे आजच्या बैठकीतून एक वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. महिन्याभरात चर्चेतून बैठकातून या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक जूलैपर्यंत कंपनी प्रशासनाने पुर्ववत मार्ग खूला करावा, अन्यथा प्रवेशद्वारासमोर मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला. पुढे चित्रलेखा पाटील सांगितले ,
—————–