भांडे प्लॉट चौकातील ४५ वर्ष जुने पिंपळाचे झाड यशस्वीपणे शीतला माता मंदिराजवळ (EPF कार्यालयाजवळ) स्थलांतरित

भांडे प्लॉट चौकातील ४५ वर्ष जुने पिंपळाचे झाड यशस्वीपणे
शीतला माता मंदिराजवळ (EPF कार्यालयाजवळ) स्थलांतरित

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेच्या वतीने एक उल्लेखनीय पाऊल उचलण्यात आले. सोमवारी (ता. ९ जून) भांडे प्लॉट चौकातील ४५ वर्ष जुने पिंपळाचे झाड यशस्वीपणे उमरेड रोड येथील शीतला माता मंदिराजवळ (EPF कार्यालयाजवळ) स्थलांतरित करण्यात आले. हे कार्य कोणत्याही सामान्य साधनांद्वारे नव्हे, तर विशेष Tree Transplanter Vehicle (झाड स्थलांतर यंत्र) च्या साहाय्याने पार पडले. हे यंत्र महाराष्ट्रात केवळ दोनच ठिकाणी उपलब्ध असून, त्याचा नागपूरमध्ये झालेला वापर म्हणजे हरित नागपूरच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यावेळी महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ अभिजीत चौधरी तसेच अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., उपायुक्त श्री गणेश राठोड, साहाय्यक आयुक्त श्रीमती सोनम देशमुख, उद्यान अधीक्षक श्री अमोल चौरपगार, श्री सतीश गुरनुळे, श्री उज्ज्वल लांजेवर उपस्थित होते.