बसपा तर्फे जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन

बसपा तर्फे जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन

जयंत साठे✍🏻
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर :- क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला जल, जमीन, जंगल यावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी इंग्रजांशी संघर्ष केला. वयाच्या 25 व्या वर्षी आपल्या जीवाचे बलिदान दिले. ते धरती आबा व उलगुलान आंदोलनाचे प्रणेते बिरसा मुंडा यांच्या 125 व्या स्मृतीदिन निमित्त बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश चे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के व राजकुमार बोरकर, जिला महासचिव चंद्रशेखर कांबळे, एड वीरेश वरखडे, बबीता डोंगरवार यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
बहुजन समाज पार्टीच्या कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत फुटाळा तलावा शेजारी असलेल्या बहुजन महापुरुष बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बसपाचे अभिलेश वाहने, अंकित थुल, अभय डोंगरे, शंभू गोंड, बामसेफचे मिलिंद वासनिक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

वाडीत बिरसा मुंडाला अभिवादन

आदिवासी समाजाला आपले हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारे बिरसा मुंडा यांना त्यांच्या 125 व्या स्मृतिदिना निमित्त वाडी च्या सोनबा नगरातील पुतळ्याला बहुजन समाज पार्टी च्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

सुरुवातीला शारदा मरसकोल्हे, सुरेखा खंडाते, माधुरी गोडांगे, दुर्गा भलावी, गीता धुर्वे आदि आदिवासी महिला कार्यकर्त्यांनी बिरसा मुंडा चे पूजन केले. त्यानंतर आदिवासी समाजातील प्रमुख कैलास मसराम, बसपा नेते उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, नगरसेवक नरेंद्र मेंढे, जिला महासचिव चंद्रशेखर कांबळे यांनी माल्यार्पण केले.

सव्वाशे वर्षांपूर्वी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वात इंग्रजा विरुद्ध आपल्या हक्क व अधिकारासाठी लढणाऱ्या आदिवासी समाजाला प्रस्थापित सरकार विरुद्ध सुद्धा संघर्ष करावा लागत असल्याचे मनोगत बसपा नेते उत्तम शेवडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर सोनपिपळे यांनी तर समारोप रितेश झटाले यांनी केला केला.

याप्रसंगी प्रामुख्याने अभिलेश वाहने, वीरेंद्र कापसे, सुशील गजभिये, अभय डोंगरे, अंकित थूल, सुभाष सुखदेवे, किशोर इंगळे, मंगेश नागदेवे, रेखलाल खंडाते, कुणाल मेश्राम, आयुष खंडारे, मनीष रामटेके, अरमान तीसके आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.