दुचाकी चोरट्याकडून ६ दुचाकी हस्तगत; ४ गुन्हे उघडकीस
अभिजीत आर.सकपाळ
भिवंडी, प्रतिनिधी
मो: 9960096076
ठाणे: भिवंडी शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्या असताना भिवंडी गुन्हे शाखेने एका आरोपीस ताब्यात घेत त्याच्या जवळून सहा दुचाकी हस्तगत करीत चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी दिली आहे. रजाउल नदीम अख्तर अंसारी, वय २४, रा. आझाद नगर, मुंब्रा (ठाणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
नारपोली पोलीस ठाणे येथे दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा करीत असताना पोलिस हवालदार साबीर शेख यांना मुंब्रा येथील एका संशयित दुचाकी चोराची माहिती मिळाली.
त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना कळवताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराज माळी, धनराज केदार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकातील सुनिल साळुंके, निलेश बोरसे, साबीर शेख, रंगनाथ पाटील, किशोर थोरात, राजेश गावडे, सुदेश घाग, अमोल इंगळे, माया डोंगरे व सायली गंभेरा यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे रजाउल नदीम अख्तर अंसारी यास संशयावरून ताब्यात घेत बोलते केल्यावर त्याने नारपोली, निजामपूर, खडकपाडा व माटुंगा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या चार गुन्ह्यांची कबुली दिली. व गुन्हे शाखेने त्याच्या जवळून १ लाख ७७ हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.