पुणे महावितरणाच्या हलगर्जी कारभारामुळे एक परीवाराच्या घराची राखरांगोळी; लाखो रुपयांचे नुकसान.

57

पुणे महावितरणाच्या हलगर्जी कारभारामुळे एक परीवाराच्या घराची राखरांगोळी; लाखो रुपयांचे नुकसान.

The ruins of a family house due to the careless management of Pune MSEDCL; Loss of millions of rupees.
The ruins of a family house due to the careless management of Pune MSEDCL; Loss of millions of rupees.

पुणे:- जिल्हातील महावितरण विभागाचा हलगर्जी कारभारामुळे एक परीवाराच्या घराची राखरांगोळी झाल्याची घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी येथील एका घराला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सकाळी 10 च्या सुमारास आग लागली असून महावितरणाच्या गलथान कामामुळे अधिक विद्युत दाब आल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

नितीन रविंद्र मोजाड यांच्या घराला आग लागली. त्यात पिठाची गिरणी, टीव्ही, मोबाईल, कपडे, रोख रक्कम 40 हजार रुपये, सर्व कागदपत्रे आणि धान्य उद्धवस्त झाले. वडील गेल्यानंतर अतिशय वाईट परिस्थितीत नितीनने घर बांधले. मिळेल ते काम करुन कॉलेज पूर्ण केले. राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्याची सर्व स्वप्न आगीत भस्म झाली.

दरम्यान, घटनास्थळी तातडीने बिडिओ हेमंत गरीबे, ग्रामसेवक गणेश थोरात, आमदार शरद सोनवने, देवराम लांडे यांनी या कुटुंबाला तातडीची 50 हजार रुपयांची मदत घर दुरुस्तीसाठी देऊ, असे आश्वासन बिडिओ गरीबे यांनी दिली. मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुळे यांनी या घटनेचा पंचनामा करुन अहवाल तहसिलदारास पाठवला आहे. गावातील नागरिक तात्काळ धावून आल्याने मोठा आनर्थ टळला.