ज्येष्ठ नागरिकांसाठीचे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न 

24

ज्येष्ठ नागरिकांसाठीचे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न 

अभिजीत आर. सकपाळ, भिवंडी

मो: 9960096076

भिवंडी पोलीस परिमंडळ – २ यांच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर रविवारी सकाळी पोलीस संकुल सभागृहात उत्साहात पार पडले. त्याचे उद्घाटन पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पोलीस अधिकारी सचिन सांगळे, विश्वास डगळे, एन. मस्के, विनायक गायकवाड, प्रमोद कुंभार यांच्या सह जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सदानंद पिंपळे, श्रीपत तांबे, सुमित्र कांबळे, कृष्णगोपाल सिंह ठाकुर, वैशाली मेस्त्री यांच्या सह मान्यवर नागरिक व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस स्तरावर विशेष कायदा नुसार भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना घरगुती, आरोग्य व इतर काही समस्या निर्माण झाल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन भिवंडी पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांनी आयोजित कार्यक्रमात केले आहे. जेष्ठ नागरिकांचे आरोग्य सुदृढ व चांगले निरोगी राहवे यासाठी राज्य शासनाचे माध्यमातून विविध आरोग्यदायी व इतर लोकोपयोगी योजना राबविण्यात येत आहे, त्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून भिवंडी पोलीस दलाच्यावतीने आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती भिवंडी डीसीपी शशिकांत बोराटे यांनी दिली.

जेष्ठ नागरिकांना कायदेशीर संरक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्कपणे काम करीत आहे. पोलीस ठाण्यात अडीअडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करीत सन्मान करावा, तसेच जेष्ठ नागरिकांना काही त्रास असेल तर पोलीस व उपविभागीय अधिकारी अर्ज करावा असे आवाहन पोलीस उपाआयुक्तांनी यावेळी केले. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी पोलीस ठाणे किंवा ११२ तक्रार करावी व कायदेशीर मदत केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.