प्रशांत नार्वेकर, अलिबाग तालुका
मो: ९१५८९९६६६६
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील सरळ येथील जनता शिक्षण मंडळ अलिबाग या संस्थेच्या शाळेत अगदी उत्साही वातावरणात सर्व नवीजीन प्रवेश घेतलेल्या व इतर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेकडून करण्यात आले .मोठ्या उन्हाळी सुट्टीनंतर मुलांनी शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये शाळेत पहिले पाऊल टाकले . त्यांच्या स्वागतासाठी शाळेची छान सजावट केली होती . गुलाब पुष्प व तोंड गोड करून फुलांच्या वर्षावात मुलांचे शाळेत स्वागत झाले .
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी म्हणून मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . मुलांच्या स्वागतासाठी सदस्य.सुशील पाटील व ऋषिकेश नाईक तसेच मोठ्या प्रमाणात पालक व शिक्षक वृंद, शाळेचे शिक्षक संतोष मढवी,पूनम मढवी उपस्थित होते.