अन्यायकारक दंड आकारणी विरोधात भिवंडीतील रिक्षाचालक संतप्त वाहतूक पोलिसांकडे तक्रार
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
9960096076
भिवंडी :- मागील काही दिवसांपासून भिवंडीत वाहतूक पोलिसांकडून शहरातील रिक्षाचालकांवर अन्यायकारक दंड आकारणी केली जात असल्याने रिक्षाचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे त्याविरोधात रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी भिवंडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त शरद ओहोळ यांच्या कार्यालयाबाहेर संतप्त निदर्शने केली आहेत.
शहरात राजनोली नाका व अशोक नगर या परिसरात वाहतूक पोलिसांकडून अतिरिक्त प्रवासी अथवा गणवेश, ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास थेट परवाना नसल्या बाबतची अन्यायकारक कारवाई करून ११ हजार ५०० रुपयांची दंड आकारणी करीत आहेत. मागील दोन दिवसात अशा ३० ते ४० हून अधिक कारवाई केल्याणे रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला असून रिक्षा संघटनेचे गिरीश जव्हेरी, कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त शरद ओहोळ यांची भेट घेऊन ही अन्यायकारक कारवाई त्वरित थांबवाई अन्यथा रिक्षा संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा गिरीश जव्हेरी यांनी दिला आहे.ज्या रिक्षा चालकांकडे अतिरिक्त प्रवासी अथवा गणवेश, ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास त्यांच्यावर योग्य ती नियमानुसार कारवाई जरूर व्हावी परंतु वाहतूक पोलिस मागील दोन दिवसांपासून मोटर वाहन कायदा कलम ६६ /१९२ नुसार थेट परमिट नसल्या बाबतची कारवाई करीत आहेत. ती अन्यायकारक असून कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, अशी प्रतिक्रिया कॉम्रेड विजय कांबळे यांनी दिली आहे.