काहीम येथे घरफोडी; लाखोचा ऐवज लंपास

काहीम येथे घरफोडी; लाखोचा ऐवज लंपास

प्रशांत नार्वेकर
अलिबाग प्रतिनिधी
९१५८९९६६६६

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील किहीम येथे बंद घरात घुसून चोरट्यांनी घरफोडी केली आहे. या घरफोडीत 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शुक्रवार ते सोमवारच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किहीम येथे अनिल दातार यांचा बंगला आहे. या बंगल्यामध्ये वयोवृध्द दातार दांमत्य राहत आहे. हे दोघेही एका कार्यक्रमानिमित्त मुंबईमधील नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे हा बंगला बंद होता. या संधीचा फायदा घेत शुक्रवार दि. 13 जूनच्या रात्री अकरा ते सोमवार दि. 17 जून या कालावधीत चोरटे घरात घुसले. त्यांनी घरातील 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी किचन व बेडरूमच्या खिडकीचे ग्रील तोडलेले दिसून आले. त्यामुळे खिडकीतून घुसून चोरट्यांनी चोरी केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन जगताप करीत आहेत.