बालकांचे हत्यारे महाराष्ट्र राज्य सरकार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप.

56

बालकांचे हत्यारे महाराष्ट्र राज्य सरकार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप.

 Maharashtra state government, BJP state vice president Chitra Wagh accused of killing children.

यवतमाळ:- एक महिन्यापूर्वीच्या भंडारा येथील घटनेत अकरा बालकांचा बळी गेला. त्यानंतर आठ दिवसांपूर्वीच्या यवतमाळ जिल्ह्यातील घटनेत बारा लहान मुले मरतामरता वाचली. परंतु, या दोन्ही प्रकरणांमध्ये आजपर्यंत पोलिसांकडे एफआयआर दाखल झालेला नाही. बालकांच्या बाबतीत इतके असंवेदनशील असलेले आणि त्यांच्या जिवाशी खेळ करणारे हे सरकार हत्यारेच आहे, असा रोखठोक आरोप भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला.

घाटंजी तालुक्यातील ‘दो बूंद’ प्रकरणातील मुलांच्या पालकांना भेटून आल्यानंतर सोमवार, 8 फेब्रुवारी रोजी यवतमाळात घेतलेल्या पत्रपरिषदेत भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ बोलत होत्या. भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, सरचिटणीस राजू पडगिलवार, अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, दत्तात्रय राहाणे, शहर अध्यक्ष प्रशांत यादव, सुनील धोटकर, शंतनू शेटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, भंडारा येथे 11 नवजात बालके धुरात गुदमरून मरण पावले. यवतमाळ येथे पोलिओ डोजऐवजी जंतुनाशक पाजल्यामुळे 12 मुले गंभीर आजारी पडली. ती सुदैवानेच बचावली. परंतु या दोन्ही प्रकरणात आज इतके दिवस होऊनही सरकारी यंत्रणेने त्याची पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. यात खरे दोषी कोण, हे या सरकारला शोधूनच काढायचे नाही काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

घडलेल्या घटनांमधील बालकांबद्दल हळहळ व्यक्त केली, त्यांना पैसे दिले की सरकारची जबाबदारी संपत नाही. या दोन्ही प्रकरणांमध्ये आजही भंडारा किंवा यवतमाळच्या पोलिस अधीक्षकांकडे अहवाल नाही, एफआयआर नाही. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे आजपर्यंत दाखल व्हायला हवे होते. बालक आणि महिला यांच्या जिवाशी, अब‘ूशी भावनांचा खेळ खेळणे आता थांबवा, असेही त्यांनी यावेळी बजावले.

महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेल्या 60 ते 70 टक्के इमारतींना अधिवास प्रमाणपत्र (ऑकोपन्सी सर्टिफिकेट) मिळालेले नाही. यासाठी कोण जबाबदार आहे, या इमारतींचे बांधकाम करणारे अशा घटनांसाठी जबाबदार नाहीत काय, असे मुद्दे उपस्थित करून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिला व मुलांच्या संदर्भात राजकारण करू नका असे कळकळीचे आवाहन केले. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही घाटंजी प्रकरणात घटनास्थळाला का भेट दिली नाही, असाही प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.