माथेरान वन व्यवस्थापन समितीच्या पुढाकारातून वाहतूक कोंडीसह पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागणार..

माथेरान वन व्यवस्थापन समितीच्या पुढाकारातून वाहतूक कोंडीसह पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागणार..

✍🏻 श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान शहर प्रतिनिधी
मो.8793831051

माथेरान :- मुंबई पुण्यातील पर्यटकांना माथेरानच्या मान्सून पर्यटनाचं प्रमुख आकर्षण असल्याने गेल्या दोन आठवड्यापासून मान्सून पर्यटनासाठी प्रचंड प्रमाणात पर्यटक माथेरानला हजेरी लावत आहे. अपुऱ्या वाहन तळ व्यवस्थेमुळे घाट मार्गात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांचे अतोनात हाल होत असताना परिणामी याचा फटका पर्यटनाला होत असल्यामुळे अखेर माथेरान वन व्यवस्थापन समिती, वन विभाग यांच्या पुढाकारातून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याकरिता माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती , टॅक्सी चालक संघटना यांच्या उपस्थितीत कोण कोणत्या उपाय योजना केल्या पाहिजे याचा दि. 19 रोजी माथेरान प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथील वाहनतळाचा आढावा घेण्यात आला.

पर्यटन हंगामात प्रत्येक वेळी नेरळ माथेरान घाट रस्त्यात होणारी वाहतूक कोंडी तसेच शहरातील माल वाहतुकीस होणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी नियोजन करताना कशा प्रकारे या ठिकाणी उपाय योजना करव्यात यासंदर्भात वन विभागाचे वन क्षेत्रपाल उमेश जंगम, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश जाधव, वनपाल राजकुमार आडे माथेरान नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सदानंद इंगळे, लेखापाल भारत पाटील माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर,टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पोलकम, अनिल सुर्वे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी गव्हर्नर हिल कडे जाणाऱ्या रस्त्यावरील टू व्हीलर पार्किंग या ठिकाणाहून पॅनोरमा पॉईंट कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या पार्किंग जागेत करण्यात येणार असून अतिरिक्त स्थानिकांच्या टू व्हीलर पार्किंग साठी एम.टी.डी.सी मागील शहरात येणाऱ्या रस्त्या लगत असणारी रिकामी जागा नेमून देण्यात आली आहे. त्यामुळे गव्हर्नर हिल कडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत तसेच सी.सी.टीव्हीची व्यवस्था करून या ठिकाणी अतिरिक्त वनव्यवस्थापन समिती तसेच माथेरान नगर परिषदेतर्फे सुरक्षारक्षक तैनात करून जवळपास 100 ते 150 चार चाकी वाहनांची व्यवस्था करण्याकरता येत्या मंगळवारपासून वनव्यवस्थापन समिती, माथेरान नगरपरिषद, माथेरानकर तसेच टॅक्सी संघटना यांच्या संयुक्त विद्यमनातून श्रमदान करण्यात येणार आहे. तर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एम.टी.डी.सी मागील रेल्वे मार्गालगत असणारा रस्ता देखील पुनर्जीवित करून मालवाहतुकीसाठी खुला करून देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याने माल वाहतुकीला येणारे अडथळे देखील दूर होतील व घोड्यांवर लादलेल्या सामानापासून येथे येणाऱ्या वाहनांचे नुकसान देखील थांबवण्या करिता मदत होईल त्यामुळे शहरात माल वाहतुकीसाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.

याप्रसंगी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीचे कुलदीप जाधव, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, चंद्रकांत जाधव, रत्नदीप प्रधान,सुनील शिंदे माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, संतोष शेलार, गिरीश पवार चंद्रकांत सुतार शकील शेख,सागर पाटील,अश्वपाल संघटनेचे अध्यक्ष आशाताई कदम आदी मान्यवर उपस्थित होते.