भिवंडी कामवारी नदीतील जलपर्णी काढण्यास सुरवात
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
9960096076
भिवंडी :- भिवंडी शहर व ग्रामीण भागाच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदीपात्राला जलपर्णीचा विळखा पडला होता. मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीपात्रात पाणी पातळी वाढली असताना नदीपात्रातील जलपर्णी नदीनाका येथे पुलाखाली अडकून पडली होती. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नदी लगतच्या क्षेत्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. या बाबतच्या बातम्या विविध माध्यमात प्रकाशित झाल्या नंतर भिवंडी महापालिका प्रशासनास जाग आली आहे. शुक्रवारी पालिका प्रशसनाने पोकलेन च्या सहाय्याने या नदी पात्रातील अडकून पडलेली जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे, ज्यामुळे येथील जलप्रवाह सुरळीत सुरू होण्यास मदत होत आहे.