“साथ भारी, पत्नीची न्यारी.!”
पत्नी ती पत्नीच असते,
मानवी जन्मास नऊ महिने लागतात, पण ती काही मिनिटांत,
लग्नांतरी अर्धांगिनी होऊन,
तहहयात साथ देते,.!
पत्नी ती पत्नीच असते,
स्वतः अर्धपोटी राहून,
धन्याला पोटभर घालते,
घरात राब राब राबते ,
सगळ्यांची काळजी घेते.!
पत्नी ती पत्नीच असते,
आनंदात सहचरिणी होते,
कष्ट करतांना बरोबरी करते,
सुख, दुःखात वाटेकरी होते,
ती रागावते, अबोला धरते,
पण अल्प काळात,
पुन्हा संवाद साधते,
नवरा किती ही चुकला तरी ,त्याची चूक, पोटात घेऊन क्षमा करणारी तीच असते.!
पत्नी ती पत्नीच असते,
एक विचाराने संसार फुलवते,
आशा, अपेक्षांना तिलांजली देते,
घर खर्चातून थोडे थोडे पैसे वाचवते,
अन तंगीमध्ये,
तेच उपयोगाला आणते.!
पत्नी ही पत्नीच असते
ती रुसते, रागावते, कडाडून भांडते,
पण त्याच्या कितीतरी अधिक,
जीव लावते, काळजी घेते,
आजारपणात अथवा वृद्धावस्थेत,
आई होऊन सेवा करते.!
आई होऊन सेवा करते.!!
आई होऊन सेवा करते.!!!
अरुण निकम, मुंबई
मो: 9323249487