सहयोग पतसंस्था अलिबाग च्या वत्तीने डिकेटी विद्यालयास ₹१,११,१११/- चा धनादेश प्रदान

सहयोग पतसंस्था अलिबाग च्या वत्तीने डिकेटी विद्यालयास ₹१,११,१११/- चा धनादेश प्रदान

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालयाचा २२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी विद्यालयाची पहिली विद्यार्थिनी तसेच सहयोग पतसंस्था अलिबागच्या संचालिका कु. श्रावणी योगेश मगर यांच्या हस्ते, विद्यालयास ₹१,११,१११/- चा धनादेश प्रदान करण्यात आला.

हा निधी सहयोग पतसंस्था अलिबागच्या रौप्यमहोत्सवी निधीतून देण्यात आला असून, संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून ही आर्थिक मदत केली गेली. यामुळे शाळेच्या विकासासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांना मोठा हातभार लागणार आहे.

कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.