वन विभाग मार्फत दुगाडफाटा येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले

वन विभाग मार्फत दुगाडफाटा येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
9960096076

भिवंडी :- वनविभागामार्फत भिवंडी तालुक्यातील वनपरिमंडळ विभाग दुगाड येथे कार्यरत असणारे वनपाल ज्ञानेश्वर शेलार यांनी भिवंडी तालुका वन परिक्षेत्र अधिकारी पूजा रक्टाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विभागात वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. वनविभागानेच वनांचे रक्षण करून निसर्गाचा समतोल राखायचा असे नाही, तर समाजातील विविध घटकांतील व्यक्तींनी आपले योगदान देऊन, आपले निरोगी आयुष्य जगण्याची प्रेरणा या घडीस देण्याची गरज भासू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून दुगाड वन परिमंडळाचे वनपाल ज्ञानेश्वर शेलार यांनी उपक्रम राबविला. तसेच नागरिकांने आपल्या गावात व शहरी भागात वृक्षारोपण कार्यक्रमचे आयोजिन करावे अशी सूचना वनपाल ज्ञानेश्वर शेलार यांनी दिली