गोरेगांव प्रेम नगर मधे चायनीस फास्ट फूड मधे दारू पिण्यास परवानगी.!

गोरेगांव प्रेम नगर मधे चायनीस फास्ट फूड मधे दारू पिण्यास परवानगी.!

पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे सर्रास चायनीस फास्ट फूड मधे बिअर बार प्रमाणे अवैध रित्या दारू पिण्यास मुभा असल्याचा प्रकार राजरोस पणे चालू आहे. असेच भर रस्त्यात, फूट पाथ वर दारू पिणारे गोरेगांव मधे दिसत असतात. कुठलाही खर्च न होण्याचा प्रकार म्हणजे फूट पाथ, आणि चाकण्याला पाहिजे असल्यास कमी खर्च म्हणजे चायनीस फास्ट फूड, जास्त खर्च नको म्हणजे बिअर बार ला वगळण्यात येते. आता येतो कायदा सुव्यवस्थे चा प्रश्न ती गोरेगांव पोलीस प्रशासनानी च धाब्यावर बसवून अवैध धंद्दे करणाऱ्यांच्या हाती दिले आहे, असे बोलायला वावगं ठरणार नाही, हफ्ते घेण्याच्या नादात पोलीस प्रशासनानी च कायदा सुव्यवस्थेची पायमल्ली केल्याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रेम नगर मधे अवैध चायनीस फास्ट फूड वर दारू पिण्यास दिलेली मुभा. तसेच त्याच्याच बाजूला असणारा सुप्रेम बिअर शॉपी, तिथे ही असाच प्रकार पहावयास मिळतो, प्रेम नगर च्या मध्यवर्ती मार्केट च्या ठिकाणी असणारा हा बिअर शॉपी तिथे तर एवढी प्रचंड गर्दी होते कि बिअर फुकटच मिळते, सर्रास लोकं बिअर घेऊन तिथेच रस्त्यावर ठाण मांडून बसतात कुठल्याही कायद्याची तमा न करता, आणि चायनीस वाल्याला तर पोलीस प्रशासनानी जणू काही परमिटच दिलाय.

दुसरा उदाहरण म्हणजे गोरेगांव एस व्ही रोड सिटी सेंटर च्या समोर व पालिकेच्या हाकेच्याच अंतरावर वजरी, मुंड्डी, अंडा, पाया सूप विकणाऱ्या अड्डयावर संध्याकाळी तुडुंब गर्दी दारू पिणाऱ्यांची पाहायला मिळते, हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने चाललंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही, आणि या अवैध धंद्दे करणार्यांना पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई न करता का पोसले जातायेत, हे विचार करण्यासारखं आहे. गोरेगांव मधे कायदा व सुव्यास्थेचे धिंडोरे काढणारे गोरेगांव पोलीस च जवाबदार आहेत. याच्यात तीळ मात्र शंखा नाही. सदर प्रकाराची गंभीर दखल घेऊन मुंबई चे नवनिर्वाचित आयुक्त श्री. देवेन भारती घेतील का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय, नाहीतर आपण स्वतः माहितीचा आढावा घेऊन सर्व पुराव्यासकट आयुक्तांची भेट घेऊन देणार असल्याचे पत्रकार व समाजसेवक पप्पू नायर यांनी माध्यमाना बोलताना सांगितले.