अलिबाग लाईन्स क्लब च्या अध्यक्षपदी प्रदीप नाईक यांची निवड
लायन्स क्लबचा शपथविधी संपन्न
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- लायन्स क्लब ऑफ अलिबागचा इंडक्शन आणि इन्स्टॉलेशन समारंभ क्षात्रैक्य समाज सभागृहात संपन्न झाला. लायन्स क्लब इंटरनॅशनलचे पदाधिकारी सीए लायन के एल परमार, फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन प्रवीण सरनाईक, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन अनिल जाधव यांच्या उपस्थितीत नवनियुक्त लायन्स पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यकर्तृत्वाची शपथ देण्यात आली. व्यासपीठावरुन बोलताना लायन परमार यांनी अलिबाग लायन्स क्लबच्या आजवरील कामाचे विशेषतः अलिबाग फेस्टिवल, टॅलेंट हंट, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी या उपक्रमांचे कौतुक करुन, नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या सर्व लायन्सना यापुढेही समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी अलिबाग लायन अध्यक्षपदी प्रदीप नाईक , सेक्रेटरीपदी महेश कवळे ,तर ट्रेझरर अमोघ किंजवडेकर, फर्स्ट व्हीपी महेश चव्हाण यांना आपल्या पदाची शपथ देण्यात आली . आपल्या नियुक्तीच्या उत्तरात नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी २०२५-२६या लायन वर्षात सर्वांच्या साथीने निष्ठेने काम करण्याचे अभिवचन दिले. यावेळी अलिबाग डायमंड अध्यक्ष श्रुती सरनाईक, लिओ लायन अध्यक्ष ओमकार मालपाणी यांच्यासह क्लब मधील इतर पदांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा संपन्न झाला. सदर प्रसंगी दहा नवीन लायन मेंबर्सचेही इन्स्टॉलेशन करण्यात आले.
या सोहळ्यातील प्रमुख उपस्थितांमध्ये रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, विजय वनगे, झोन चेअरपर्सन विकास पाटील, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे, नयन कवळे, प्रियदर्शनी पाटील, मावळत्या अध्यक्ष गौरी म्हात्रे, अंकिता पाटील, शिल्पा कवळे,डॉ रेखा म्हात्रे, अविनाश राऊळ, रमेश धनावडे, नितीन शेडगे, नितीन अधिकारी,रोहन पाटील,महेंद्र पाटील, संतोष पाटील, डॉ चंद्रकांत वाजे, श्रीकांत ओसवाल, अनिल आगाशे,परेश भतेजा, अभिजित आमले, रणजित जैन, विद्या अधिकारी ,अतुल वर्तक, सीमा शेडगे, संतोष सागवेकर यांच्यासह अलिबाग क्लबचा लायन परिवार, अलिबाग डायमंड्स, नागाव, किहीम, पोयनाड, मुरुड आणि इतर लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांसह दोनशेहून अधिक लायन्स उपस्थित होते.
या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन जान्हवी आगाशे आणि अपर्णा पाटील यांनी केले.