मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी आज बुधवारी शहरातील विविध महत्त्वाच्या नाला भिंत बांधकाम प्रकल्पांची केली पाहणी
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी आज बुधवारी (ता. २५ जून) शहरातील विविध महत्त्वाच्या नाला भिंत बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली. या पाहणीत पारडी उड्डाणपुलाजवळ सुरू असलेले नाला भिंत बांधकाम, पारडी पोलिस ठाण्याजवळील कच्चा नाला, दुर्गा नगर पुलाजवळील नाला भिंत आणि करारे नगर येथील स्मार्ट सिटी पुलाची पाहणी केली. यासोबतच अतिरिक्त आयुक्त यांनी लकडगंज झोनअंतर्गत पवनगाव संगम परिसरालाही भेट देऊन तेथील स्थानिक विकासकामांची पाहणी केली. यावेळी लकडगंज झोनेच सहायक आयुक्त श्री विजय थूल,कार्यकारी अभियंता श्री सचिन रक्षमवार यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.