मीरारोड येथे सिलेंडरने भरलेल्या गाडयात सिलेंडरच्या स्फोट, 1 जण घायाळ.

अस्मिता सपकाळ
मुंबई:- गॅस सिलेंडर स्फोटानं मध्यरात्री मिरा रोड हादरून गेलं. मध्यरात्री 2 वाजता राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत सिलेंडरचे स्फोट झाले. त्याठिकाणी आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या. त्या दोन्ही गाड्यांना भीषण आग लागली होती. त्यानंतर त्यातील भरलेल्या सिलेंडरचे एकामागून एक स्फोट झाले.
मीरारोड येथील रामनगर परिसरात 7 फेब्रुवारीच्या रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. येथील मोकळ्या मैदानात भारत गॅस आणि एच्पी गॅस यांचे सिलेंडर भरलेले २ ट्रक उभे होते. यातील एका ट्रकमध्ये स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर अग्नीशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. सिलेंडर फुटण्याचा आवाज 5 किलोमीटरपर्यंत ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. सुदैवाने ही घटना मोकळ्या मैदानात घडल्याने मोठी हानी टळली. आग विझवतांना एका जवानाला किरकोळ दुखापत झाली. ट्रकमधील 95 टक्के सिलेंडर वाचवण्यात मीरा-भाईंदर अग्नीशमन दलाला यश आले.
जवळपास 7 स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. रात्री झोपी गेलेले रहिवाशी या स्फोटाने पूर्णपणे हादरून गेले. स्फोट एवढा तीव्र होता की, स्फोटामुळे आजूबाजू घरांच्या काचा फुटल्या. सिलेंडरचा पत्रा तसेच गाडीचा पत्रा हा शेजारील सोसायटीच्या आवारात पडला. सिलेंडरच्या उडलेल्या तुकड्याने दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ती जागा आरक्षित असल्याने पूर्णपणे मोकळी होती. तेथे नेहमी भरलेल्या सिलेंडरच्या गाड्या उभ्या केल्या जातात. तसेच आजूबाजूल इतर वाहन देखील पार्किंग केलेली असतात. दरम्यान काही नागरिकांनी येथे अवैद्य सिलेंडरची रिफेलिंग होत असल्याचा ही आरोप केला आहे. विशेष म्हणजे ही जागा वसई विरार- मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या अगदी मागे 100 मीटर अंतरावर आहे.