तिनवीरा दरोडा प्रकरण! पोलीस हवालदार सूर्यवंशी यांना न्यायालयाकडून दिलासा

तिनवीरा दरोडा प्रकरण! पोलीस हवालदार सूर्यवंशी यांना न्यायालयाकडून दिलासा

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-दरोडाप्रकरणात अडकविण्यात आलेल्या अलिबाग पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस हवालदार हनुमंत सूर्यवंशी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दीड कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणी सुर्यवंशी यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तपास कार्यात सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील तिनविरा धरणाजवळ चार फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या दरोडा प्रकरण पोयनाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात समाधान पिंजारी याचा समावेश असून,. सुमारे पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात. त्यासंदर्भात समाधान पिंजारी 5 फेब्रुवारी रोजी अलिबाग पोलिस ठाण्यात आला होता. पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्याशी भेट घेतली. त्यावेळी हनुमंत सूर्यवंशी हे देखील एका गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन निरीक्षकांकडे गेले होते. निरीक्षक साळे यांच्या सूचनेनुसार सूर्यवंशी यांनी समाधान पिंजारीकडून माहिती घेतली. नामदेव हुलगे या आरोपीशी संपर्क साधून पैसे परत करण्यास सांगितले. संबंधित नोंदी पोलिस स्टेशनच्या रजिस्टरमध्ये केल्या गेल्या होत्या. सूर्यवंशी यांनी पिंजारीला नोटीस देऊन 6 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितल होतेे. तो त्यादिवशी पोलिस ठाण्यात येऊन जबाब देखील देऊन गेला. नामदेव हुलगे याच्या नातेवाईकांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप सूर्यवंशी यांच्यावर ठेवण्यात आला होता. परंतु, संबंधित कॉल तपास अधिकाऱ्याच्या निर्देशावरून अधिकृत नोंदीनुसार करण्यात आला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुर्यवंशी यांच्या वकीलाने केलेल्या युक्तीवाद करीत न्यायालयासमोर अनेक पुरावे सादर केले. त्याचा विचार करीत न्यायालयाने सुर्यवंशी यांचा अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. एक ते तीन जूलै या कालावधीत त्यांनी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.