अनधिकृत इमारतीवर भिवंडी महानगरपालिकेचा कारवाई

अनधिकृत इमारतीवर भिवंडी महानगरपालिकेचा कारवाई

भिवंडी महानगरपालिका अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या ॲक्शन मोडवर

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी: भिवंडी शहरातील अनधिकृत इमारती बांधकामांवर सक्त कारवाईचे आदेश भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर यांनी दिल्यानंतर प्रभाग समिती क्रमांक ३ चे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अनधिकृत इमारतीवर कारवाई केली आहे. तसेच आयुक्त अनमोल सागर, अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त विक्रम दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती क्रमांक तीन चे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांच्या नेतृत्वामध्ये बीट निरीक्षक सुरज गायकवाड,कर्मचारी नारायण पाटील, इंद्रपाल जाधव, जयेश जाधव व अतिक्रमण पथक व कर्मचारी यांनी मौजे कामतघर येथील सर्व्हे क्रमांक स.नं.४/१/अ या जागेत भगवान मल्लेशम उपुल्ला यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत अनधिकृत बांधकामावर पालिका प्रशासनाकडून कायदेशिर प्रक्रीया पूर्ण करुन संबधित पोलिस स्टेशनमध्ये पोलिस गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ही अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस बंदोबस्त घेऊन या अनधिकृत बांधकाम ठिकाणी जेसीबी च्या सहाय्याने इमारतीचे १२ गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात आली. अशी माहिती प्रभाग समिती ३ चे सहाय्य आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी दिली