घर परिवार – अरुण निकम

115

घर परिवार – अरुण निकम 

घर परिवार म्हणजे दिवस अन रात्र ,

कधी सुख तर कधी दुःख,

सगळीकडे असते विविधांगी सर्वत्र, 

डोंगरागत संकटांची,

रांग लागली तरी ,

धैर्याने सामोरे, जावे लागते मात्र

 

घर परिवार म्हणजे खेळ लपंडावाचा,

कधी अश्रूंचा तर कधी आनंदाश्रूचा,

कधी धाकाचा तर कधी प्रेमाचा,

कधी मत मतांतरांवर,

सकारात्मक निर्णय घेण्याचा, 

तर कधी भांडलो तरी, 

एकत्र बसुन गुण्यागोविंदाने जेवण्याचा.!

 

घर परिवार नसते, 

सिमेंट, विटांच्या घराचे, 

त्याच्या भिंती असतात,  

अतूट नात्याच्या, 

आंतरिक जिव्हाळ्याच्या, 

छप्पर असते स्थैर्याचे,

विश्वास असतो जिवाला जीव देण्याचा, 

चुकल्यास क्षमा करून, 

समजून, उमजून चूक सुधारण्याचा.!

 

घर परिवार म्हणजे असते हमी,

जीवनाच्या स्थैर्याची,

विश्वासाची, साथ देण्याची, 

 एकमेकांवर जीव ओवाळून टाकण्याची, 

अन एकमेकांशी मनमुराद भांडण्याची.!

 

घर परिवार म्हणजे असते शाळा, 

मर्यादेची, संस्काराची, जबाबदारीची, 

कर्तव्य दक्षतेची, त्यागाची, 

भविष्य घडविण्याची, 

नातं जपण्याची, अन वडील धार्‍यांचा मान, सन्मान राखण्याची.!

 

अन वडीलधार्‍यांचा, मान सन्मान राखण्याची.!!

अन वडीलधार्‍यांचा ,मान सन्मान राखण्याची.!!!

अरुण निकम, मुंबई

मो: 9323249487