चंद्रपुरातील कोरोना योद्ध्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगारासाठी आंदोलन. 

62

चंद्रपुरातील कोरोना योद्ध्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगारासाठी आंदोलन. 

 Corona warriors in Chandrapur agitate for salaries of contract health workers.

चंद्रपुर:- देशात करोना विषाणूचा संसर्ग वाढतच चालला होता. अनेक राज्यांमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत होता. अशा कोरोना व्हायरसचा प्रकोपाच्या काळात ज्या कोरोना योद्ध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा केली. त्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आता कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच बिऱ्हाड थाटण्याची वेळ आली आहे.

चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी गेल्या 7 महिन्यांपासून वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत. महत्वाची बाब म्हणजे या 500 कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आलं आहे. पण पगारच नसल्यामुळे या कोरोना योद्ध्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

पगारासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे सततचा पाठपुरावा करुनही काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच या कोरोना योद्ध्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.

आपल्या कुटुंब-कबिल्यासह या कोरोना योद्ध्यांनी रस्त्यावरच कडाक्याच्या थंडीत डेरा टाकला आहे. याठिकाणी जेवण आणि राहण्याच्या सर्व व्यवस्थेसह हे कंत्राटी कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. जनविकास कामगार संघाचे पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.