निवडणुका लढविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे-उद्योगमंत्री उदय सामंत

निवडणुका लढविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे-उद्योगमंत्री उदय सामंत

महाराष्ट्रात होणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका,पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीला शिवसेना सज्ज

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी : आगामी महाराष्ट्रात होणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेनेला भरघोस यश मिळवून भगवा फडविण्याचे लक्ष पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवले आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आपले मतभेद विसरून एकदिलाने सज्ज होऊन कामाला सुरुवात करावी असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भिवंडीत आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्यात केले आहे. तसेच येणाऱ्या काळात राज्यात नगरपालिका, महानगर पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सार्वत्रिक निवडणुका होणार आहे त्यामुळे
ठाणे जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने मोर्चा बांधणी सुरू झाली आहे. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका
मध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी व पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्यामध्ये चैतन्य भरण्यासाठी भिवंडी लोकसभा कार्यक्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते साठी मार्गदर्शन मेळावा शिबीर भिवंडी तालुक्यातील वडपा गावाजवळील रिसॉर्ट मध्ये काल सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, रूपेश म्हात्रे, शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख देवानंद थळे, भिवंडी पश्चिम शहर प्रमुख शाम पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन ठाणे शहर व ग्रामीण जिल्ह्यावर शिवसेनेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कार्यकर्तेनी पक्ष मजबूत करून कामाला लागावे अशी सुचना यावेळी मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख देवानंद थळे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्यावर पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसंपर्क संवाद मोहीम व आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकांची व्युहरचना करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मध्ये संवाद साधण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार ठाणे ग्रामीण क्षेत्रात शिवसेनेने जोरदार पक्ष बांधणी सुरू केली असून ग्रामीण जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी संपर्क मोहिमेद्वारे शिवसैनिकांशी संवाद व मतदारसंघातील मतदारांशी संपर्क साधण्याचे कामकाज सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून हा संवाद मेळावा घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शनपर भाषण करून आपली मनोगत व्यक्त केली. या शिबीर मेळाव्यास मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.