०१ जुलै भारत बंदसाठी न्यु प्रगती शैक्षणिक संस्थेचा जाहीर पाठिंबा

27

०१ जुलै भारत बंदसाठी न्यु प्रगती शैक्षणिक संस्थेचा जाहीर पाठिंबा

ठाणे: भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पीछडा (ओबसी) वर्ग मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली *01 जुलै 2025* रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी भारत बंद आंदोलनाला न्यु प्रगती शैक्षणिक संस्था (रजि.) कडून ठाम आणि जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

संस्थेच्या सचिव मा. अनिता खरात मॅडम यांनी सांगितले की, “संविधानाची रक्षा, सामाजिक समता, आणि शिक्षणाच्या मूलभूत हक्कासाठी आम्ही या आंदोलनाच्या सोबत आहोत. देशातील लोकशाही संस्थांवर होणाऱ्या आघातांचा आणि शैक्षणिक बाजारीकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यामुळेच या भारत बंदला आमचा स्पष्ट व सक्रिय पाठिंबा आहे.”

न्यु प्रगती शैक्षणिक संस्था गेली अनेक वर्षे आदिवासी, वंचित आणि दुर्बल घटकांमध्ये बालवाड्यांद्वारे शिक्षणाचा उजेड पोहोचवत आहे. संस्थेच्या भूमिकेमुळे या आंदोलनाला शैक्षणिक क्षेत्रातूनही नैतिक बळ मिळत आहे.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भारत बंदमधील राष्ट्रीय मागण्या जसे की ईव्हीएमचा विरोध, ओबीसी जनगणना, बहुजन महापुरुषांचा सन्मान, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवणे, सांस्कृतिक आणि धार्मिक स्वायत्ततेचे रक्षण या सर्व मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे.