पोलिसांच्या रिक्षांवरील कारवाईविरोधात भिवंडी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

पोलिसांच्या रिक्षांवरील कारवाईविरोधात भिवंडी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी: भिवंडी मागील काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालकांना लक्ष करून अव्वाच्या सव्वा दंड आकारणी करीत कारवाई केली जात आहे. त्यामुळे अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली असून या अन्यायकारक कारवाया तत्काळ थांबवण्यात याव्यात, या मागण्यांसाठी भिवंडीतील रिक्षा चालकांच्या भिवंडी रिक्षाचालक-मालक महासंघाच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर उग्र निदर्शने केली. यावेळी उपस्थित भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे,यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, या सर्व मागण्यांवर संबंधित मंत्री महोदयांशी यांच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, कॉम्रेड विजय कांबळे यांसह बाळासाहेब ओव्हाळ, गिरीश जव्हेरी, खालिद शेख, मोह.अयुब खान, वसीम शेख, मकसूद अन्सारी, अख्तर शेख, इम्रान शेख, मेहबूब शेख, महात्मा म्हस्के, इद्रिस शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो रिक्षा चालक-मालक सहभागी झाले होते. योग्य कागदपत्रे असणाऱ्या रिक्षा चालकां वर करण्यात येणारी अन्यायकारक कारवाई बंद करा, रिक्षांकरीता आवश्यक रिक्षा थांबा उपलब्ध करावा, खाजगी बसेस वर कारवाई करा, एस.टी महामंडळ व महापालिका बस मध्ये परवानगी पेक्षा जास्त प्रवासी वाहतुक घेणाऱ्या बसेसवर कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन आंदोलन कर्त्यांच्या वतीने देण्यात आले, भिवंडी शहरात ४० हजार रिक्षा चालक रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहेत. अनेक सुशिक्षित बेरोजगार नाईलाजास्तव रिक्षा चालवत आहेत.परंतु सध्या वाहतूक पोलिसांकडून नाहक रिक्षा चालकांना लक्ष करून कारवाईचा सपाटा सुरू आहे, तो अन्यायकारक असून जर या कारवाया वेळीच न थांबविल्यास बेमुदत रिक्षा बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा देत, त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी प्रतिक्रिया महासंघाचे कॉम्रेड विजय कांबळे यांनी दिली आहे.