When is the flyover on Kalmeshwar Gondkhairi route in Nagpur district?
When is the flyover on Kalmeshwar Gondkhairi route in Nagpur district?

नागपूर जिल्हातील कळमेश्वर गोंडखैरी मार्गावर उड्डाणपूल कधी??

When is the flyover on Kalmeshwar Gondkhairi route in Nagpur district?

युवराज मेश्राम प्रतिनिधी
नागपूर:- जिल्हातील काटोल कळमेश्वर मार्गावर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु कळमेश्वर एमआयडीसी मार्ग गोंडखैरी जाणारा नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा कळमेश्वर गोंडखैरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल कधी होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

कळमेश्वर शहरातून गोंडखैरी ला जाणाऱ्या या मार्गावर उड्डाणपूल बनवण्याची जुनी मागणी आहे असून त्यादृष्टीने रेल्वे विभागाकडून प्रयत्नही झाले परंतु गोंडखैरी वरून कळमेश्वर मार्गे सावनेरला जोडणारा चौपदरी मार्ग हा कळमेश्‍वर शहराच्या बाहेरून जात असून या मार्गावर उड्डाणपूल बनत आहे. त्यामुळे गोंडखैरी मार्गावरील उड्डाणपुलाचा विषय थंडबस्त्यात तर गेला नाही ना अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे सध्या गोंडखैरी वरून सावनेर ला जाणाऱ्या चौपदरीकरण मार्गाचे काम जोरात सुरू आहे या मार्गावरून अमरावती कडून येणाऱ्या जड वाहने ही सावनेर छिंदवाडा भोपाल वन्य मार्गाकडे थेट जाणार आहे. या मार्गाला कळमेश्वर शहरात प्रवेश न देता एम.आय.डि.सी परिसरातून वळण देऊन काटोल मार्गावरील खडक नदी ब्राह्मणी क्षेत्रात उड्डाणपूल तयार करून मार्ग बनवल्या जात आहे. त्यामुळे पुढील काळात ब्राह्मणी या गावाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. या मार्गावर उड्डाणपूल बनविण्यात यावा अशी फार जुनी मागणी आहे या मार्गावर कळमेश्वर आतील क्षेत्रातून औद्योगिक क्षेत्र असून सावंगी, लिंगा, उपरवाही, लोणारा, सेलू, आष्टी, कला, कळंबी केता, पार, असे अनेक गावे आहेत दिवसभरात अनेकदा रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद असल्याने या मार्गावर मार्गक्रमण प्रमाण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणार्‍या अधिकारी कर्मचारी वर्गाला या गेट मुळे मोठा त्रास सहन करावा लागतो हा गेट बंद असल्याने कामावर जाणारे नोकरदार व मजूर वर्ग यांना विलंबाने जावे लागते. तसेच खेडे विभागातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा रेल्वे क्रॉसिंग चा फार त्रास सहन करावा लागतो. रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल करणाऱ्या दृष्टिकोनातून रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून पाहणी करण्यात आली, परंतु दिवसभर यातच वाहतुकीचे निरक्षण सुद्धा करण्यात आले, मात्र उड्डाणपुलाचे कार्य कुठे रगडले हे कळायला मार्ग नाही, गेल्या कित्येक वर्षापासून या मार्गावर उड्डाणपुलाची फार मोठ्या प्रमाणात मागणी होत असून ही मागणी पूर्वाधात नेण्यात संबंधित अधिकाऱ्यांची उदासीनता व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. कळमेश्वर ते गोंडखैरी मार्गावरील महामार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन कळमेश्वर औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार अधिकारी व या मार्गावरील ग्रामीण विभागातील राहणारे नागरिक व शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचवण्यात यावा अशी मागणी कळमेश्वर तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here