भंगार सामान गोळा करताना रेकी करून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास भिवंडी पोलिसांनी मध्य प्रदेशातून केली अटक
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी: भिवंडी शहरातील विविध भागात फिरून भंगार सामान गोळा करत असतानाच बंद असलेल्या घर आणि दुकानांची रेकी करून तेथे घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्यांस पोलिसांनी मोठ्या शिताफीने माग काढून मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने परिसरात केलेल्या घरफोडीतील एक लाख रुपये किमंतीचे सहा लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केले असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.मागील काही दिवसांपूर्वी
भिवंडी शहरातील गोपाळ नगर परिसरात असलेल्या एका वकिलाच्या कार्यालयात घरफोडी झाली होती त्यामुळे
लॅपटॉप चोरी केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील,
सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश गायकर व पोलीस पथकातील संतोष मोरे,संतोष
पवार,सैय्यद,किरण जाधव,दिनेश भुरकुड,रविंद्र पाटील,गणेश कांबळे, बर्वे, रोशन जाधव हे कर्मचारी करीत असताना शांतीनगर तसेच कचेरी पाडा या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असताना एका संशयती आरोपीचा चेहरा निष्प्पन्न होताच मिळालेल्या माहीती वरुन तपास सुरू केला असता सदर आरोपी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे असल्याचे समजताच पोलीस पथकाचे तेथे जाऊन आरोपी इमरान गफुर शेख (वय २४ रा.रहमतपुरा, शांतीनगर) यास शिताफीने ताब्यात घेवुन अटक करून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने शांतीनगर भागातील घरफोडीच्या ४ गुन्ह्यांची कबुली दिली.त्याच्या जवळून घरफोडीत चोरी केलेलं एक लाख रुपये किमतीचे सहा लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत.अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली आहे.घरफोडी करणारा चोरटा इमरान शेख हा भंगार गोळा करणारा असून भंगार गोळा करतानाच घर व कार्यालयांची रेकी करून तो घरफोडी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.