सेवानिवृत्त कर्मचा-यांना भिवंडी महानगरपालिकेचा निरोप

सेवानिवृत्त कर्मचा-यांना भिवंडी महानगरपालिकेचा निरोप

अभिजीत आर.सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानाप्रमाणे ११ कर्मचारी सेवानिवृत्त व स्वेच्छा निवृत्त झाल्याने महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर (भा.प्र.से) यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेतर्फे सेवानिवृत्त कर्मचा-यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून निरोप देण्यात आला. याप्रसंगी सहा-आयुक्त (आरोग्य) शैलेश दोंद यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यांत आला आणि त्यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांना त्यांच्या पुढील आयुष्याकरीता शुभेच्छाही देण्यात आल्या. महानगरपालिकेच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या तिस-या मजल्यावरी स्व.विलासराव देशमुख
सभागृहात संपन्न झालेल्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमातून प्रकाश सदानंद पाटील (लिपीक तथा प्र.कार्या. अधिक्षक), संतोष आत्माराम ठाकुर (वाहनचालक), वामन केरबा बनसोडे (वाहनचालक), पंजाब रामधन राठोड (वाहनचालक), श्रीमती.रोशना शरद मुकादम (बालवाडी शिक्षिका), श्रीमती. ललिता व्यंकटेश गुंडला, (बालवाडी मदतनीस), शकील अहमद हरुन मोमीन (थियेटर अटेंडन्ट), कैलास नथुराम घोष्टेकर (सफ़ाई कामगार), श्रीमती अस्मिता आनंद घाडगे (सफ़ाई कामगार), अनंता बाळु जाधव (सफाई कामगार), विष्णू शंकर बेरडिया (सफ़ाई कामगार), अशा ११ सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त मनपा कर्मचा-यांना महानगरपालिकेच्यावतीने निरोप देण्यांत आला.