कोप्रोली प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी साजरी

कोप्रोली प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी साजरी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील रा. जि. प. उच्च प्राथमिक शाळा – कोप्रोली ता.अलिबाग.शाळेमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून विदयार्थ्यांन मध्ये भक्ती भाव व एकतेची भावना निर्माण करण्या साठी आषाढी एकादशी दिंडी वारीचे आयोजन करण्यात आले.
मोठ्या उत्साहाने छोटे वारकरी टाळ घेऊन, झेंडे फडकवत तसेच इ. ६वी व७वी च्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर नाचत वारीत सहभाग घेतला सर्व विद्यार्थी पारंपरिक वेषभूषा परिधान करून पालखी सोबत व वेषभूषा करून आलेले श्री. विठ्ठल व रुक्मिणी यांच्या सोबत शाळेतून निघून संपूर्ण गावातून दिंडी मध्ये सहभागी झाले होते.
अश्या या दिंडी सोहळ्यात सर्व विद्यार्थी, कोप्रोली शाळेतील शिक्षक वृंद, पालक वर्ग व कोप्रोलीचे उपसरपंच प्रफुल्ल वार्डे इ. मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. विलक्षण आनंदाने विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन विठू नामाचा गजर करत गात होते काही पालक मोठ्या भक्ती भावना पालखीचे स्वागत करत होते. सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला.
दिंडी चे आयोजन व प्रयोजन यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संध्या पाटील, विषय शिक्षिका सौ. ज्योती पाटील, उप शिक्षक नित्यनाथ म्हात्रे, विजय पाटील, श्रीम. श्रध्दा भोईर व सर्व विद्यार्थी, पालक इ.आषाढी दिंडी वारीचे आयोजन उत्तम प्रकारे मोठ्या उत्साहाने साजरे केले.