धुळे राष्ट्रवादीचा संवाद कार्यक्रमात जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, हाणामारी. 

62

धुळे राष्ट्रवादीचा संवाद कार्यक्रमात जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, हाणामारी. 

 In Dhule NCP's dialogue program, NCP workers clashed in front of Jayant Patel.

धुळे :- खान्देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी बघायला मिळाली. या हाणामारी मागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, राष्ट्रवादीतील ही गटबाजी धुळेकरांसाठी नवी नाही. माजी आमदार अनिल गोटे यांचे समर्थक आणि इतर गटाच्या समर्थकांमधील गटबाजी असल्याचं धुळ्यात सर्वश्रूत आहे. धुळ्यात मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या बैठकीत काही विषयांवरुन कुजबूज सुरु झाली. या कुजबूजवरुन दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झालं.