कशेडी घाट खून प्रकरणातील आरोपी अखेर गजाआड; पोलादपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!
श्री सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर :- पोलादपूर पोलादपूर तालुक्यातील जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मे महिन्याच्या मध्ये आढळलेल्या अज्ञात मृतदेहाच्या खून प्रकरणाचा अखेर छडा लागला असून, पोलादपूर पोलिसांनी संशयित आरोपींच्या “हाईड अँड सीक” ला पूर्णविराम देत, मुख्य दोघा आरोपींना गजाआड केले आहे. या उत्कृष्ट तपासामुळे पोलिस दलाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
ही घटना मे महिन्यात घडली होती, जेव्हा कशेडी घाटात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलादपूर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि मानवी गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने मृतदेहाची ओळख पटवली आणि लगेचच एका संशयिताला अटक केली.
पुढील तपासात या खुनामागे दोन मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. हे दोघे तब्बल दोन महिन्यांपासून फरार होते आणि आपली ओळख लपवत कर्नाटकमधील सीमाभागात लपून राहत होते. अखेर पोलिसांनी अथक प्रयत्न करत, गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना पकडले.
अटक केलेले आरोपीपुढीलप्रमाणे:वंदना दादासाहेब पुणेकर (वय ३६) मोहन पांडुरंग सोनार (वय ५४)
या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील बी.एन.एस. कलम – १०३(१), २३८, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई श्रीमती आंचल दलाल, पोलीस अधीक्षक रायगड, तसेच श्री. अभिजीत शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. शंकर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोलिस निरीक्षक आनंद रावडे (पोलादपूर पोलीस ठाणे), पो.हवा/८७३ तुषार सुतार, पोना/१३६९ अनुजित शिंदे आणि मपोशी/२५० बनसोडे यांचा मोलाचा सहभाग होता.
या उत्कृष्ट तपास कार्याबद्दल पोलादपूर पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत असून, गुन्हेगारीला आळा बसवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.