पोषण ट्रॅकर व घरपोच आहार ऑनलाइन नोंदणी प्रशिक्षण संपन्न

पोषण ट्रॅकर व घरपोच आहार ऑनलाइन नोंदणी प्रशिक्षण संपन्न

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका व अंगणवाडी सेविका यांच्यासाठी पोषण ट्रॅकर व घरपोच आहार ऑनलाइन नोंदणी बाबत विशेष प्रशिक्षण गुरुवारी (दि.१०) अलिबाग तालुक्यात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

पोषण ट्रॅकर प्रणाली अंगणवाडीच्या कामकाजातील सर्वाधिक महत्त्वाचा विषय आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कामकाज करताना अंगणवाडी सेविकांना काही अडचणींचा सामना करवा लागतो. यामुळे दैनंदिन समस्यांचे निराकरण व इत्यंभूत मार्गदर्शन या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका व अंगणवाडी सेविका यांना देण्यात आली. तसेच लाभार्थ्यांना घरपोच आहार ऑनलाइन नोंदणी संदर्भातील ॲप बाबतही तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण वर्गामुळे अंगणवाडी सेविका व मुख्य सेविकांना पोषण ट्रॅकर वापराबाबत येणाऱ्या बऱ्याच समस्यांचे निराकरण होऊन अंगणवाड्यांच्या कामकाजात सुलभता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी व्यक्त केला. मुख्य प्रशिक्षक म्हणून आयुक्तालयामार्फत कृष्णा कुयटे, आशिष बोरकर, शुभम यांनी प्रशिक्षण दिले.
………………